न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जाने.) :- चिंचवडच्या श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय आणि श्रीमती सी. के. गोयल प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या के. एस. बी. चौकाजवळील क्षात्रवीर छत्रपती संभाजीराजे मैदानावर शुक्रवार (दि. २६) रोजी सकाळी ८.०० वाजता NDA, Pune चे वरीष्ठ अधिकारी डाॅ. अशोक देविकर, चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी एम.आय.डी.सी.भोसरी पोलिस स्टेशनचे PSI श्रीकांत शेडगे, उद्योजक लक्ष्मणराव काचुळे, रत्नाकर जगताप, किरण अडसुरे, निघोट हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव हे होते. उपस्थित पाहुण्यांचे सत्कार आणि सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव व पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष व संस्थेचे संचालक अमित बच्छाव यांनी पुणेरी पगडी, उपरणे आणि दगडूशेठ गणपतीची प्रतीकृती असलेले गणेश मंदिर आणि पुष्पगुच्छ देवून केले. या प्रसंगी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या राष्ट्रीय सोहळ्याच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली तर ३०० विद्यार्थ्यांच्या पथकाने सामुहिक कवायत सादर करून, विद्यालयाच्या शिस्तीचे सादरीकरण केले. पाहुण्यांच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, देशभक्तीपर गीत, पूजा नृत्य, पोवाडा, देशभक्तीपर कविता, श्री देवा गणेशा हे दर्जेदार कार्यक्रम सादर करून भावपूर्ण वातावरण निर्माण केले. शाळेच्या विद्यार्थिनींनी रोप मल्लखांबची प्रात्याक्षिके सादर करून पाहुण्यांची मने जिंकली तर शाळेतील ८० मल्लपटूनी एकाचवेळी ३ लाकडी मल्लखांबावर चित्तथरारक आसने सादर करून शारीरिक तंदुरुस्तीचे धडे दिले. यावेळी शाळेच्या खेळाडूंनी जीम्नास्टिक्सचे विविध प्रकार सादर केले. शाळेच्या पालक असलेल्या सौ हर्षदा गाडे आणि माजी विद्यार्थी प्राजक्ता देसाई यांनी विद्यार्थ्यांचा योगा सादर पालकांचा देखील या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कु. विमुदा जतकर या बालवर्गाच्या मुलीने म्हातारीची “चलरे भोपळ्या टुणूक टुणूक” ही गोष्ठ सांगून धमाल उडवून दिली तर कु.विजया निंबाळकर या ९ वी तील मुलीने दंगलीतील एक हिंदू-मुस्लीम ऐक्याचा वास्तव प्रसंग सांगून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. या राष्टीय सोहळ्यात प्रथमच संस्कृत मधून पोवाडा सादर करून विद्यालयाने प्राचीन संस्कृती जतनाचे कार्य केले.
सदर प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये शेतकरी नृत्य, ठाकर गीत, ‘हम है इंडियावाले’ श्री गणेशा, बालवर्गाचा डान्स, इंग्रजी ड्रामा, इंग्लिश स्पीच इ. कार्यक्रम सादर करून पाहुण्यासह शाळेच्या २००० पालकांची मने जिंकली. तसेच विविध परीक्षांमध्ये आणि खेळात घवघवीत यश संपादन करणार्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात थरार निर्माण केला तो शाळेच्या लेझीम आणि ढोल ताशा हलगी पथकाने या लेझीम पथकानें मावळे आणि मावळणीच्या पोशाखात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरोखर जिवंत करून सर्वांच्या टाळ्या वसूल केल्या. तर शाळेचेच पालक तबलावादक श्री कुंभार आणि हार्मोनियम वादक सुतार यांनी बसविलेल्या वंदे मातरम या शास्रीय गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ.श्री विवेक मुगळीकर सर यांनी कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. ते आपल्या मनोगतात म्हणाले,“ अशा प्रकारचे सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आपण आपल्या जीवनात कधीही पाहिलेले नाहीत, विद्यार्थी मित्रानो, तुम्ही खूप भाग्यवान आहात कि तुम्हाला इतकी छान शाळा आणि चांगले वातावरण मिळाले ,” असे प्रशंसा उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. तर NDA, Pune चे वरीष्ठ अधिकारी डाॅ.अशोक देविकर सर यांनी सर्वप्रथम संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांचे प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी देखील विद्यार्थ्यामधील talent चे खूप कौतुक केले. “ शिवाजीराजे शाळा ही खर्या अर्थाने एक आदर्श शाळा आहे.विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान वाढीसाठी शाळेतील सायन्स पार्क सेंटर मधील विविध प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोग शाळेचे फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो.शाळेतील शिस्तेबद्दल त्यांनी भरभरून कौतुक केले.देशसेवेसाठी तरुणांची फार मोठी फौज ही शाळा निर्माण करीत असल्याबद्दल सर्व शिक्षक आणि त्याच्या पालकांचे अभिनंदन केले.आण्णांनी कमी शिक्षण घेवून देखील फार मोठी शैक्षणिक संस्था उभी केली याचा मला खुप अभिमान वाटतो.असे गौरवाउद्गार काढले.”
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचे अभिनंदन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
संस्थेने या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधत संस्थेतील प्रत्येक शिक्षकाला सन्मानित करण्याचा निर्णय मागील प्रजासत्ताक दिनापासून घेतला. त्यामुळे यावर्षीचा पुरस्कार वरिष्ठ शिक्षिका सौ.वीर मॅडम आणि क्रीडाशिक्षक श्री.भालेराव सर तसेच ज्येष्ठ शिक्षक पचेल सर यांना तो सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, उपरणे आणि दगडूशेठ गणपतीची प्रतीकृती असलेले गणेश मंदिर आणि पुष्पगुच्छ हे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री अनिल करपे यांनी केले. सूत्रसंचालन शब्बीर मोमिन सर यांनी केले तर प्राचार्य श्री बाळाराम पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका प्रतिभा देशपांडे, सुनिता भोर, सुचित्रा झेंडे, मुबारक मोमीन, दीप्ती मुन्तोडे, सौ शिंदे, सुषमा संधान, सौ परदेशी, सौ.भिटे, श्री पगार, श्री साहेबराव देवरे, श्री बाळू महाजन, सायली कोल्हे, मनीषा चिखले, ज्योती जॉन, मनीषा जाधव, सुमेधा कुलकर्णी, प्रज्ञा जाधव, प्रवीण पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.











