न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जाने.) :- पिंपरी चिंचवड शहरात अनियमित वीजपुरवठा होत असून, त्यामुळे शहरातील नागरिक वैतागलेले आहेत. याबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहरप्रमुख गणेश जाधव यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता वायफळकर यांना समस्यांचे निवेदन दिले आहे.
विजेचा नियमित पुरवठा तसेच मीटर रिंडींग मधील झोल थांबवण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहरप्रमुख गणेश जाधव, विद्यासागर गायकवाड, रुपेश कदम, अॅड. दत्ताराम साळवी, गोरकनाथ कवडे, रविराज मांडवे, कैलाश कुदळे, सुनिल निकम आदी उपस्थित होते











