न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- कृषी व ग्रामविकास विभागाची नाळ जनसामान्यांशी जुळली आहे त्यामुळे विविध योजनांच्या लाभार्थ्यांना व पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनांसाठी सद्द्या ऑनलाईन ट्रेंड सुरू झाल्याने अशा बदलत्या परिस्थितीत सकारात्मक चर्चा व्हावी म्हणून ग्रामगौरव व शब्दसारथी प्रकाशनाच्या वतीने कृषी व ग्रामविकास विभागाचे धोरण: काल,आज व उद्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान,लोकनेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पुणे दौऱ्यावर असल्याचे औचित्य साधत मूळ जळगाव येथील मासिक ग्रामगौरव व जनसंग्राम न्यूज नेटवर्कच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उदघाटन प्रशांत सपकाळ यांच्याहस्ते होणार आहे. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर परिसंवाद होईल.
शुक्रवार,४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राहतील तर उपस्थितांना आदर्श गाव योजना समितीचे राज्य कार्याध्यक्ष व आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री डॉ.पोपटराव पवार मार्गदर्शन करतील.पुणे जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांची यावेळी विशेष उपस्थिती राहील.
पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील सुरेख सोसायटीमध्ये कोरोनाचे शासनाने घालून दिलेले नियम पाळून परिसंवाद कार्यक्रम होईल.पुणे जिल्ह्यातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,कृषी व व्यवसाय व्यवस्थापन तसेच पत्रकारिता विषयाचे पदवी व पदवित्तर शिक्षण घेणाऱ्या निमंत्रित विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सहभाग राहील असे जनसंग्राम न्यूज नेटवर्कचे समूह संपादक विवेक ठाकरे,ग्रामगौरव मासिकाच्या संपादीका कु.धनश्री ठाकरे व शब्दसारथीचे संपादक पराग पोतदार यांनी कळवले आहे.यशस्वीतेसाठी मानद संपादक अमोल मचाले,वाणिज्य संपादक विशाल घोडेस्वार व युनिट हेड प्रिया गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत.