न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ३) रोजी १०८४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २३८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३५१८२२ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३३६०६७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५७६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०४ एवढी आहे.