- त्या नावासमोर मारणार डिलीटचा शिक्का…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२२) :- राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनुसार विधानसभेच्या प्रभागनिहाय ४६ मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने ५ जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या मतदारसंघांची मूळ मतदार यादी व पुरवणी यादी जिल्हाधिकाऱ्यांकडून पालिका मागवून घेणार आहे. त्या याद्यातून प्रभागनिहाय विभाजन केले जाणार आहे. मतदार यादीतू वगळण्यात आलेल्या मतदाराच्या नावासमार डिलीटचा शिक्का मारला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून मूळ व पुरवणी मतदार यादी घेऊन त्यातून प्रभागनिहाय मतदार यादी तयार केला जाईल. त्यासाठी अधिकारी कर्मचारी नियुक्तीचे काम सुरू आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.


















