न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकती, सूचनांच्या सुनावणीसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती, सूचना नोंदविण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी दिला आहे. या हरकतींवर २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी विभागीय अधिकारी यांच्यासमक्ष सुनावणी घ्यायची आहे. २ मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह हा आराखडा निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे.


















