न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जाने.) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत मागील चार वर्षात ४ वेळा शहरात येऊन अभिवचने दिली. एवढेच नव्हे तर चापेकर वाड्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात शास्तीकर शुल्क आकारण्याचे अधिकार महापालिकेला देण्यात येत आहेत, शास्तीकराचा मुद्दा महत्वाचा आहे.
नियमितीकरणाचे शुल्क किती घ्यायचे? याचे अधिकार महापालिकेला दिले आहेत, असे जाहीर कार्यक्रमात फडणवीस यांनी म्हटले होते. परंतु, अद्यापपर्यंत शास्तिकराचा प्रश्न सुटला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा शंभर टक्के शास्तीकर माफ करावा. याच्या निषेधार्थ विरोधकांनी एकत्र येऊन आज गुरुवार (दि. ३१) रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर भाजप सरकारचा शंख वाजवून घंटानाद आंदोलन करत निषेध करण्यात आला आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, पंकज भालेकर, स्वराज अभियानचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, माजी महापौर कवीचंद भाट, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, काँग्रेसचे संग्राम तावडे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, शेकापचे हरिष मोरे, शिवशाही व्यापारी सेनेचे युवराज दाखले, गणेश आहेर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, सुभाष साळुंके, प्रल्हाद कांबळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले आहेत. ‘भाजप सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या होत्या.











