- शाळा, गृहनिर्माण संस्था, हॉटेल, हॉस्पिटल आदींचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहराला देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ व सुंदर शहर बनवण्यासाठी शहरातील सर्व घटकांचा सहभाग महत्वाचा असून महापालिका क्षेत्रातील विविध आस्थापनांनी स्वच्छता स्पर्धेत सहभाग नोंदवून स्वच्छतेच्या चळवळीत नवा आदर्श उभा केला आहे. शहरवासीयांच्या सहभागामुळे पिंपरी चिंचवड शहराला निश्चितपणे देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून बहुमान मिळेल, असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला.
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ सुरु झाले आहे. या अंतर्गत महापालिकेच्या वतीने विविध आस्थापानांतर्गत स्वच्छता स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, आरोग्य वैधकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्यासह सत्कारार्थी उपस्थित होते. विजेत्यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते शाल,पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये करून घेण्याकरीता माहिती, शिक्षण व संवादाद्वारे समन्वय साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे, असा संरचनात्मक कार्यक्रम महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, कचरा वर्गीकरण, पायाभूत सुविधा, स्वच्छता अप डाऊनलोड आदी निकषांच्या आधारेस्वच्छता स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना गुणांक देण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे-
स्वच्छ शाळा :- (माध्यमिक विभाग) एकूण १२६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
१. द गुड समॅरीटन स्कुल, काळा खडक, वाकड, ( “ड” क्षेत्रिय कार्यालय) – प्रथम क्रमांक
२. पिं.चि.मनपा शाळा क्र. ९२, म्हेत्रेवस्ती, (“फ” क्षेत्रिय कार्यालय) – व्दितीय क्रमांक
३. बाबुराव घोलप कॉलेज, नवी सांगवी, (“ह” क्षेत्रिय कार्यालय) – तृतीय क्रमांक
४. ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी, (“अ” क्षेत्रिय कार्यालय) – तृतीय क्रमांक
स्वच्छ गृहनिर्माण संस्था :- एकूण १३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
१. ग्रीन्स सोसायटी, थेरगांव (ग क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक.
२. कल्पतरू इस्टेट फेज – २, जवळकरनगर, पिंपळे गुरव (ड क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
३. सुखवाणी कॅम्पस, वल्लभनगर (ह क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक
स्वच्छ मंडई :- एकूण १० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .
१. फुल मार्केट मंडई, पिंपरी – (ह क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
२. कावेरी भाजी मंडई, कावेरी नगर,वाकड – (ड क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
३. अखिल चिंचवड मंडई, चाफेकर चौक, चिंचवड – (ब क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक
स्वच्छ शासकीय कार्यालय :- एकूण ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .
१. तळवडे करसंकलन विभागीय कार्यालय, यमुनानगर – (फ क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
२. पोस्ट ऑफिस, पिंपळेगुरव गावठाण – (ड क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक
३. वाकड पोलिस स्टेशन, वाकड, थेरगांव – (ग क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक
स्वच्छ हॉटेल :- एकूण ९७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
१. किज हॉटेल, सेन्ट्रल मॉल शेजारी मोरवाडी, पिंपरी – (अ क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
२. श्री शिवाई हॉटेल, एच ब्लॉक,मोरवाडी – (अ क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक
३. अभिशिनिया हॉटेल, वाकड – (ड क्षेत्रीय कार्यालय) – व्दितीय क्रमांक
४. अतिथी हॉटेल, थेरगांव – (ग क्षेत्रिय कार्यालय) – तृतीय क्रमांक
५. हॉटेल कलासागर, वल्लभनगर – (ह क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक
स्वच्छ हॉस्पिटल :- एकूण ३३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
१. नविन आकुर्डी रूग्णालय, आकुर्डी – प्रथम क्रमांक
२. जिजामाता हॉस्पिटल, पिंपरी कॅम्प, पिंपरी – प्रथम क्रमांक
३. नविन थेरगांव रूग्णालय, थेरगांव गावठाण, थेरगांव – प्रथम क्रमांक
४. नविन भोसरी हॉस्पिटल, गुळवे वस्ती, भोसरी – प्रथम क्रमांक
५. ओएनपी लिला हॉस्पिटल, ७२ बीआरटी रोड – प्रथम क्रमांक
६. स्टर्लिंग हॉस्पिटल, प्राधिकरण निगडी – प्रथम क्रमांक
७. विनस हॉस्पिटल, जाधववाडी, चिखली – व्दितीय क्रमांक
८. वेदान्त मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, चिंचवड – तृतीय क्रमांक
















