- पालिकेकडून महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२२) :- शासनाची किंवा महापालिकेची परवानगी न घेता गर्भपाताच्या गोळ्या बाळगून रुग्णांना त्या गोळ्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टर महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गव्हाणे वस्ती, भोसरी येथील शीतल क्लिनिक दवाखान्यामध्ये ४ फेब्रुवारीला ही घटना घडली.
महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे (वय ५७, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात महिला डॉक्टरविरोधात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शीतल क्लिनिक नावाच्या दवाखान्यामध्ये गर्भपाताची सेवा देण्यासाठी शासनाची किंवा महापालिकेची परवानगी घेतली नाही. त्यानुसार गर्भपात विरोधी क्लिनिक नोंदणीकृत नसताना आरोपीच्या दवाखान्यामध्ये गर्भपाताच्या गोळ्या असल्याबाबत माहिती मिळाली. महापालिकेच्या समितीकडून ४ फेब्रुवारीला आरोपीच्या क्लिनिकची पाहणी करण्यात आली. त्यावेळी क्लिनिमध्ये गर्भपाताच्या गोळ्या मिळून आल्या.
















