न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रु.) :- मोदी सरकारने शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये देण्याची घोषणा करून, एक प्रकारे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. शेतकरी लोकसभेच्या स्वस्तात हॉटेलमध्ये जेवत नाहीत. सरकारने देशभर गावपातळीवर एक रुपयात भोजन देणारे हॉटेल्स उभारल्यास शेतकऱ्यांना सहाशे रुपये पुरतील, असा उपरोधिक टोला, चिंचवड विधानसभेचे शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांनी भाजपच्या अर्थसंकल्पावर हाणला आहे.
मोदी सरकारने १५ लाख देशवासीयांच्या खात्यावर अद्याप टाकले नाहीत. पाच लाखापेक्षा किमान १५ लाखापर्यंत कर सवलत द्यायला हवी होती. सरकारने पुन्हा जुमलेबाज बजेट सादर केले असल्याचे, सौंदणकर यांनी सांगितले आहे.















