न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १ फेब्रु.) :- शेतकऱ्यांना महत्वाचा आहे बाजार भाव. भारतामध्ये आजारी उद्योगांची संख्या ३० टक्क्यांच्या वर आहे. त्यांना त्यामध्ये सूट मिळावयास हवी होती. त्याने नक्कीच त्यांच्यावरचा अर्थभार कमी झाला असता. परंतु, त्यांना पुन्हा स्थापित करण्यासाठी सरकारने आतापर्यंत कुठलेही ठोस पर्याय उपलब्ध केलेले नाहीत.
अकाउंट एनपीए झाल्यास बँका त्या उद्योजकांना पुन्हा भांडवल देत नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडून, त्यावर आधारित अनेक कामगार बेरोजगार झाल्यामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. फक्त गर्भवती महिलांसाठी दिलासादायक अर्थसंकल्प आहे. तसेच सर्वसामान्य लोकांना ६.५ लाख टॅक्समध्ये सूट हा एक दिलासा.
सरकारने स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया तसेच मुद्रा लोन अशा अनेक घोषणा जाहीर केल्या. परंतु, या योजना राबविण्यास जागा दिली नाही. मुद्रालोन बँका सर्वसामान्य लोकांना कर्ज देत नाहीत. त्यामुळे या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. या सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये नॉन परफॉर्मिंग असेट्स जाणीपूर्वक वाढवले आहेत. त्यामुळे एका वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे, असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय सोपानराव भोर यांनी सांगितले.











