न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रु.) :- लॉजिस्टिक मार्केट क्षेत्रातील आकुर्डीस्थित एक्सिक्युटीव्ह कार रेंटल सर्व्हिसेस (ईसीआरएस) ही पुणे व पिंपरी चिंचवड शहरात एकमेव कारसेवा भाडेतत्वावर देणारी संस्था आहे.
ग्राहकांसाठी गुणवत्तापूर्ण सेवेच्या माध्यमातून भाडेतत्वावर सर्व प्रकारचे वाहने उपलब्ध करून देणे, हा या संस्थेचा हेतू आहे. या संस्थेच्या गुणवत्तापूर्ण व सचोटीबद्ध कार्याची दखल घेत, युकेच्या आंतराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणक संस्थेकडून ”आयएसओ ९००१ : २०१५” मानांकन या संस्थेस प्राप्त झाले आहे.
ग्राहकांना उत्तम दर्जेदार सेवा प्रदान करणाऱ्या ईसीआरएस या संस्थेचे महाराष्ट्र व भारतात देखील ग्राहक आहेत. ग्राहकांच्या विश्वासार्ह प्रवासासाठी उत्तम दर्जेदार सेवा प्रदान करण्याकरीता, आम्ही सुसज्ज आहोत, असे या संस्थेचे अध्यक्ष दीपक मोढवे यांनी सांगितले आहे.














