- ‘यंदाचा निर्धार भाजपा १०० पार’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहरातील पक्षाचे विस्तारक आणि प्रमुख पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. ‘बूकिंग ऑफ व्होट’ संकल्पनेनुसार शहरात काम करण्याची सूचनाही दिली.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपाचे १०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी ‘यंदाचा निर्धार भाजपा १०० पार’ असा निर्धार करत शनिवारी भाजपाची विस्तारक कार्यशाळा उत्साहात पार पडली.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, रवींद्र अनासपुरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.