न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२२) :- हिजवडीतील फेज तीन येथील टीएसजी सोसायटीसमोरील रस्त्याने छोट्या टेम्पोतून भरधाव आलेल्या आरोपीने तरुणाच्या दुचाकीस जोरात धडक दिली. हा प्रकार शनिवारी (दि. १२) रोजी हिंजवडीत घडला.
अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रमोद नंदू चव्हाण (वय २३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुनील अरुण हिरे (रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज संपत शेंडगे ( वय ३२ , रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला हिजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
















