न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ फेब्रु .) :- चिंचवड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची त्यांच्या दिल्ली येथील निवास्थानी भेट घेतली. यावेळी त्यांना काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. जयराम शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा भेट देण्यात आला.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न व्हावयास हवेत. त्याकरीता आपण शहरातील नेतृत्वास बळ द्यायला हवे. चेतना व ताकद देण्याची ही योग्य वेळ आहे. काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे विचार व त्यांच्या धारधार तलवारी सारखे कार्य करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र धर्माप्रमाणे भारत धर्म वाढवावा व पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाला जुने वैभव प्राप्त करून द्यावे, अशा स्वरूपाचे मार्गदर्शन करण्याची मागणी यावेळी चव्हाण यांच्याकडे संदेशकुमार नवले व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.











