- प्राधिकरणात शिवजयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन..!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या सुखासाठी अखेरपर्यंत आपला देह झिजवला. त्यांचा आदर्श घेऊन नवतरुणांनी मोठ्या उमेदीने कार्याला लागले पाहिजे. त्यांची शिकवण जनमाणसात रुजविली पाहिजे. त्यानेच महाराजांच्या मनातील आदर्श महाराष्ट्र घडेल, असे प्रतिपादन माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवारी (दि. १९) रोजी नगरसेविका शैलजाताई मोरे यांच्या प्राधिकरणातील जनसंपर्क कार्यालयात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी सलीम शिकलगार, विजय शिनकर, मनोज देशमुख, प्रसेन अष्टेकर, आर. एस. कुमार, राधिका बोरलीकर, जयेश मोरे, सागर घोरपडे, सचिन बनसोडे, चेतन झोळ, सुहास करडे व प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय! अशा घोषणा देण्यात आल्या.
















