- राज्यभरातून मान्यवरांची मांदियाळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- किल्ले शिवनेरीवर देखील शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर उत्साहाचं वातावरण असून शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती आहे. कार्यक्रमात पोलिसांकडून महाराजांना मानवंदना देण्यात आली. ढोलताशांचा गजर आणि पोवाड्यांचा आवाज संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर दुमदुमतोय. शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर आज राज्यातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.प्रकृती अस्वस्थामुळे मुख्यमंत्र्यांना शिवनेरी किल्ल्यावरील कार्यक्रमाला यायला जमलं नाही, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.