- जुलैअखेर लाभार्थ्यांना भरावी लागणार ९० टक्के रक्कम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२२) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्राधिकरणातील पेठ क्रमांक १२ मध्ये ४ हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी ३ हजार सदनिकांसाठी आत्तापर्यंत अंतिम वाटपपत्र देण्यात आले आहे.
येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पात ३ हजार ३१७ सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर, १ हजार ५६६ सदनिका या अल्प उत्पन्न घटासाठी उभारल्या आहेत. या गृह प्रकल्पात ११ मजल्याच्या एकूण ४५ इमारती आहेत.
पीएमआरडीकडून आत्तापर्यंत ३ हजार सदनिकांसाठी लाभार्थ्यांना अंतिम वाटपपत्र देण्यात आले आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात दहा टक्के रक्कम भरली आहे. रेरा कायद्यानुसार या गृहप्रकल्पाचे बांधकाम ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहे. जुलै अखेरपर्यंत लाभार्थ्यांकडून ९० टक्के रक्कम भरुन घेतली जाणार आहे.
















