- निगडीतील ओटास्कीममधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२२) :- जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाकडे रागाने पाहत कु-हाडीने हल्ला केला. तसेच तरुणाच्या पत्नीला शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना निगडीतील ओटास्कीम येथे घडली. याप्रकरणी राहुल मगर सरोदे (रा. संजयनगर, ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार बाबासाहेब शाहू कांबळे (वय ३८, रा. संजयनगर, ओटास्कीम, निगडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे रविवारी (दि. २०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांचे शेजारी राहणारे सूरज यादव यांच्यासोबत घरासमोर उभे राहिले होते. त्यावेळी आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीकडे रागाने पहिले.
त्यावेळी फिर्यादी हे यादव यांना म्हणाले की, तो माझ्याकडे रागाने पाहत आहे. त्यावेळी आरोपीने त्याच्या घरातून जाऊन कुऱ्हाड आणून फिर्यादीच्या खांद्यावर मारली. यामध्ये गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करून तुला पण बघुन घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.













