न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २३) रोजी ७७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३५८४२८ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३५३६३९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४६१९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.












