न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२२) :- पतीने ६३ हजार ९९० रुपये किमतीचा लॅपटॉप अॅमेझॉन इंडिया कंपनीतून ऑनलाइन खरेदी केला. त्यानंतर अॅमेझॉन कंपनीच्या डिलिव्हरी एजंटने १० फेब्रुवारीला लॅपटॉप म्हणून दिलेले पार्सल उघडून पहिले असता, त्यामध्ये लॅपटॉपऐवजी दोन किलो मिठाच्या पुड्या व खाकी कागद मिळून आला.
लॅपटॉपचा अपहार करून फिर्यादी व त्याच्या पतीची अंमेझॉन कंपनीतील अज्ञात व्यक्तीने फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. जना प्रणीत जोशी (रा. सुखवानी कॅम्पस, वल्लभनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पिपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.