- मोरवाडीतील अपंग भवनास राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२२) :- सहा वर्षाच्या आतील तसेच गर्भावस्थेत दिव्यांगांच्या बाबतीत उपचार करण्यासाठी एक स्वतंत्र मजला राखीव ठेवावा. येणाऱ्या प्रत्येक दिव्यांगास सक्षम, तंदुरुस्त करून पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपरी, मोरवाडी येथील अपंग भवनास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा ते बोलत होते. मोरवाडी येथील अपंग भवन सहा हजार चौरस फूटाचे असून ते चार मजल्यात विभागले आहे.
यावेळी उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, शिवाजी चौरे तसेच स्वीय साह्यक गौरव जाधव प्रहार
जनशक्ती पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विनोद गायकवाड,नंदकिशोर जगदाळे, संजय गायखे, संदीप जाधव, मिठालाल सोनी,दत्तात्रय भोसले, अपंग क्रांतिच्या महिला अध्यक्षा संगिता जोशी,एम आय एम संघटनेचे पदाधिकारी धम्मराज साळवे उपस्थित होते.