न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च २०२२) :- चिखलीतील रास्त भाव धान्य दुकानास पुणे विभागाचे अन्न पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, फ विभागाचे परिमंडळ अधिकारी नागनाथ भोसले यांनी नुकतीच भेट दिली.
दुकानात सुरु असलेल्या आयएसओ मानांकनाच्या कामाची पाहणी केली. रेशनकार्ड धारकांना वेळेत अन्न पुरवठा होत असल्याबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार लांडगे यांचे बंधू भैय्या लांडगे, प्रभागातील स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, स्वस्त धान्य दुकानदार सौ उषा छाजेड, फ क्षेत्रीय कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक बबन माने, वंदना साबळे, विक्रम छाजेड, कार्डधारक महिला व नागरिक यांची उपस्थिती होती.
















