- महापौर व पालिका प्रशासन पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गातून मारणार रपेट…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२२) :- पुण्यातील मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष उद्घाटनानंतर पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गाचे ऑनलाइन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. ६) सकाळी ११.१५ ला होणार आहे. त्यानंतर महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक मेट्रोतून पिंपरी ते फुगेवाडी अशी सफर करणार आहेत, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी गुरुवारी (दि. ३) दिली.
महापौर म्हणाल्या की, पिंपरी ते फुगेवाडी या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असल्याने या मार्गाच्या उद्घाटनासाठी ऑनलाइन यंत्रणेची व्यवस्था पिंपरी – चिंचवड महापालिका भवन मेट्रो स्टेशन येथे केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालय येथे मेट्रोला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गाचे ऑनलाइन उद्घाटन होईल. त्याचवेळी पालिकेचे पदाधिकारी, गटनेते, नगरसेवक पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यान मेट्रोतून प्रवास करतील. मेट्रोच्या उद्घाटनामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी प्राप्त होणार आहे. सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
















