- खेळात सहभागी महिलेला बक्षिसाची हमी; काळेवाडीतील सोमनाथदादा तापकीर युवा मंचचा उपक्रम…
- स्पर्धेत दुचाकीसह सोन्या चांदीचे दागिने जिंकण्याची महिलांना संधी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२२) :- काळेवाडीतील सोमनाथदादा तापकीर युवा मंचच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रभाग क्र. ३२ तापकीरनगर, ज्योतिबानगर, रहाटणीतील महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी रविवार (दि. ६) रोजी सायं. ६ वा. तापकीर मळा परिसरातील हॉटेल नानाश्री समोर ”खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात महिलांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. गप्पा, गोष्टी, रंजक खेळ आणि भरपूर बक्षीस जिंकण्याची कार्यक्रमात उपस्थित महिलांना संधी असणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक स्वराज्य रक्षक मालिकेतील राणुआक्का अर्थात अश्विनी मांगडे यांचे आकर्षण असून विशेष उपस्थितीमध्ये ”वन फोर थ्री” या चित्रपटाची संपुर्ण टिम कार्यक्रमास उपस्थिती दर्शविणार आहे. कार्यक्रमाचे सादरीकरण रमेश परळीकर करणार आहेत.
कार्यक्रमातील विजेत्या स्पर्धकांमधील प्रथम क्रमांकास टू व्हीलर व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांकास एलईडी टीव्ही (LED TV) आणि मानाची पैठणी तर तृतीय क्रमांकास कुलर व मानाची पैठणी भेट देण्यात येणार आहे. लक्की ड्रॉ योजनेतील भाग्यवान विजेत्यांना १ फ्रीज, ५ सोन्याच्या नथ, ५ पैठणी, ५ चांदीचे बिचवे जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय खेळात सहभागी प्रत्येक महिलेस आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
प्रभागातील महिला आणि अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. सहभागी महिलांनी आनंद व असंख्य बक्षिसे लुटावीत असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा ओमसाई ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथदादा तापकीर यांनी केले आहे.
















