- आगीत मोठे आर्थिक नुकसान; जीवितहानी नाही…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२२) :- चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील पत्राशेडच्या चार ते पाच दुकांनाना अचानक आग लागल्याची माहिती मिळाली. १.४५ वाजता चार बंब घटनास्थळी दाखल झाले. यात वल्लभनगर अग्निशमन दलातील २ बंब, निगडी प्राधिकरणातील १ बंब तर चिखलीतील १ बंब घटनास्थळी पोहचले.
तासाभरात आग आटोक्यात आली. या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र ५०-६० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.













