न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु.) :- माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिकांविरुद्ध अपशब्द वापरले होते. याच्या निषेधार्थ शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी त्या घटनेचा खरपूस समाचार घेत, शुक्रवार (दि. १) रोजी वाकड पोलिस स्टेशन येथे कलम १५५ फौजदारी दंडसहीत भादवी कलम ५०० अन्वये माजी खासदार निलेश नारायण राणे यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. या धाडसाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेत, युवराज दाखले यांना सोमवार (दि. ४) रोजी तात्काळ मातोश्रीवर पाचारण केले होते.
यावेळी शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युवराज दाखले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे, अमोल कोल्हे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी, मनोज शिंदे, आशिष वाळके, रविकिरण घटकार, सौरभ शेंडगे, नवनाथ (माऊली) जाधव आदी उपस्थित होते.

अशा मावळ्याची आज शिवसेनेला खरी गरज असून, अन्यायाच्या विरोधात यल्गार उभे करणारा हा मावळा सर्वसामान्य जनतेचे व व्यापारी वर्गाचे नजीकच्या काळात आधारस्तंभ बनेल, त्याकरीता त्यास हवी ती ताकद शिवसेनेच्या वतीने पुरविली जाईल, असे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या धाडसाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांनी गौरवोद्गार काढले.
सध्या पिंंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची ताकद कमी झालेली असताना, शहरात शिवसेनेचे आस्तित्व टिकविण्यासाठी नव्या दमाचे दाखले यांच्या कामगिरीची दखल प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, यातच सर्व काही मिळवले. नजीकच्या काळात शहराची पक्षाकडून मोठी जबाबदारी दाखले यांच्या शिरावर पडणार असल्याचे, सुतोवाच या घटनेच्या रूपाने दिसत आहे.
आपल्या कार्याने दाखले हे शिवसेनेचे दिवंगत माजी शिवसेना शहरप्रमुख नेताची चव्हाण, बाबासाहेब धुमाळ, भगवान आप्पा वाल्हेकर, बाजीराव लांडे व भारतीय विद्यार्थीं सेना माजी शहरप्रमुख रामभाऊ उबाळे, मा. उपशहरप्रमुख दिलीप आंब्रे यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. शिवसेनेमध्ये आक्रमक स्टाईल जपणारे नेतृत्व आगामी पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीत शड्डू ठोकून व दंड थोपटवून थैमान घालणार, यात कोणाचेच दुमत नसावे. त्यामुळे शिवसेनेच्या या नव्या दम्याच्या कार्यकर्त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.











