न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : ‘नगरसेवक आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नगरसेवक शैलेश मोरे यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरीता, प्रभागात प्रत्यक्ष भेट दिली.
या उपक्रमाच्या माध्यमातून नगरसेवक शैलेश मोरे यांनी प्रभागस्तरीय समस्या जाणून घेण्याकरीता खंडागळे चौक, कूपर कोपरा, माल् धक्का चौक, आनंदनगर, चिंचवड येथील नागरिकांच्या पाणी, आरोग्य, व इतर मुलभूत समस्या जाणून घेतल्या.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या समस्यांवर ताबडतोब कार्यवाही करण्याकरीता यावेळी शैलेश मोरे यांनी सूचना केल्या. तसेच प्रभागातील नागरिकांनी आपल्या अडी-अडचणी व समस्यांसाठी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.















