न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रु.) :- सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप समारंभ उत्साहात पार पडला. परीक्षेसाठी व भावी आयुष्यासाठी मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी शुभेच्छा दिल्या. बाठिया म्हणाल्या, की आयुष्यात पुढे जाण्यासाठी एकदाच संधी मिळते. मेहनत, कष्ट केले, तर नक्कीच आयुष्यात यशस्वी व्हाल. आई-वडील व शिक्षकांचे नाव उज्वल करा, अशा शुभेच्छा मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी दिल्या.
आयुष्यात मोठ्या धैर्याने मार्गक्रमण केले. तसेच आत्मविश्वास, धैर्य, चिकाटी, जिद्द बाळगली, तर शुभेच्छा सत्कारणी लागतील, अशा शुभेच्छा आशा घोरपडे यांनी दिल्या. केतकी तोडकर आणि श्रुती मांडेकर या विद्यार्थीनींनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांना गहिवरून आले होते.
या कार्यक्रमास सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, मधु दाणी, भटू शिंदे आदींसह शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम पवार यांनी, तर रिंकू सिंगवी यांनी आभार मानले.











