न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२२) :- पुणेकरांच्या खिशावर भर पडण्याची शक्यता आहे. पीएमपीच्या तिकिटांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पीएमपी बस सेवा तोट्यात सुरु आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी तिकिटांच्या दरात वाढ केली जाणार आहे.
ही वाढ ग्रामीण भागातील तिकीटदरात केली जाणार असल्याचे कळाले आहे. रोजचा ७० रुपयांचा पासही बंद केला जाणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातील तिकीटाचे दर हे एसटी बस प्रमाणे होणार आहे.
एकीकडे सार्वजनिक वापर करण्याचे आवाहन केले जाते तर दुसरीकडे तिकिटांच्या दरात वाढ केली जाते. याचा फटका मात्र, सामान्य नागरिकांना बसतो.


















