न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२२) :- एका मोबाईल नंबरवरून SBI बँकेचे नेट बँकिंग सस्पेंड होणार आहे. तुमचं पॅनकार्ड अपडेट करा अशा आशयाचा इंग्रजीत टेक्स्ट मॅसेज फिर्यादीला आला.
त्यात एक लिंक दिलेली होती. त्यावर क्लिक करून तक्रारदार यांनी पॅनकार्ड अपडेट केले तसेच माहिती आणि ओटीपी भरून दिला. काही सेकंदातच त्यांच्या SBI बँक खात्यातून ४ लाख ९५ हजार रुपये कमी झाल्याचा मॅसेज आला. या प्रकरणी अशोक विठ्ठलराव मडावी (वय- ५०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. भोसरी पोलिस पुढील तपास करीत आहे.
















