न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२२) :- प्राधिकरणातील शंकराच्या मंदिरावरील चार पितळी कळस अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि. ९) रात्री दहा ते गुरुवारी (दि. १०) सकाळी आठच्या दरम्यान चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मंदिरातील चार पितळी कळस आणि दक्षिणा पेटीतील रोख रक्कम असा एकूण पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. चोरटे मंदिराच्या पाठीमागील लोखंडी कंपाउंडची जाळी उचकटून मंदिरात आले असल्याचे उघडकीस आले.
सचिन बाबुराव बनसोडे (वय ४२, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.












