- सकाळी ८ ते सायंकाळी ९ एकूण १३ तास धावणार मेट्रो…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२२) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आता प्रवाशांच्या माहितीकरिता पुणे मेट्रोने अधिकृत वेळापत्रक आणि ऑनलाइन अॅपची माहिती जाहीर केली आहे. प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
मेट्रोने सांगितल्यानुसार, पुणे व पिंपरी-चिंचवड येथे सकाळी ८ ते सायंकाळी ९ अशी एकूण १३ तास मेट्रोची सुविधा असणार आहे. यात दर अर्ध्या तासाला स्थानकावरून गाडी सुटणार आहे. त्यामुळे एकूण दिवसभरात २७ फेऱ्या मेट्रो ट्रेनच्या होतील.
पुण्यात ही मेट्रो ट्रेन गरवारे कॉलेज ते वनाज दरम्यानचा टप्पा अवघ्या १६ मिनिटांत पार करेल, तर पिंपरीमध्ये पीसीएमसी ते फुगेवाडी हा टप्पा मेट्रो ट्रेन अवघ्या २० मिनिटांत पार करेल. त्यामुळे प्रवाशांनी जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.












