न्यूज पीसीएमसी नीटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) :- देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या आयुष मंत्रालय संचलितयोगा प्रमाणीकरण मंडळ, नवी दिल्लीद्वारे घेतल्या जाणाऱ्या योग शिक्षक व मुल्यांकन कर्ता लेवल ३ परिक्षेत वारजे पुणे, येथील अश्विनी लाडेगांवकर यानी यश संपादन केले आहे.
ही परिक्षा आँनलाईन माध्यमातून प्रात्यक्षिक व सिध्दांतीक स्वरुपात घेतली जाते. या परिक्षेसाठी साधारण एक महिन्याचा प्रशिक्षण व या अभ्यासाकरीता मिळतो. या परिक्षेसाठी त्याना पतंजली योग पिठाचे योगगुरु श्रीराम लाखे (वकील), वल्लभ जोशी आणि रत्नाकर कुलकर्णी यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले.
अश्विनी ह्या शाळा, वैयक्तिक हेल्थ क्लब, सोसायटी यातील लहान मुलामुलींना व ७० वर्षापर्यंतच्या स्त्रियांना जलतरण प्रशिक्षण देत आल्या आहेत. त्या शैक्षणिक द्रुष्ट्या B.A. मानसशास्त्र पदवीधर असून त्या स्पोर्ट न्युट्रीशियन सल्लागार आहेत. Pandemic मुळे २.५ वर्षापासून घरी राहिल्याने व स्वतःला Covid झाल्याने समाजातील लोकांना मानसिक व शारीरिक त्रास कशाप्रकारे झाला याचा त्याना जवळून अभ्यास करता आला. स्वतः Covid रुग्न असताना कोणतीही भिती, मानसिक खच्चीकरण न करता केवळ योग व योग्य आहार यातून त्या व त्यांचे कुटुंब सहज बाहेर पडले. त्यामुळेच योगामध्ये जास्त रुची निर्माण झाली व यांत सखोल अभ्यास करायचे ठरले.
अध्यात्मिक संस्कार लाभलेल्या रामकृष्ण विवेकानंद सेवा केंद्र, भादोले येथील प.पु.स्वामी सेवानंद महाराज यांच्या वडील बंधूंची मुलगी आहेत. त्यामुळे आध्यात्म, मानसिक व शारीरिक स्तरावर योग कसा परिणाम करून त्यांत कशी प्रगती करता येते याची त्यांना प्रचिती आली. त्यामुळे योगातुन समाजकार्य व देशसेवा करण्याची संधी त्याना दिसून आली.
यात त्यांना त्यांची बहिण अंजली पाटील व सारिका सेजल यांच्या मदतीने या YCB keval 3 चे मार्गदर्शन घ्यायचे ठरवले. पतंजली योगपीठ योगगुरू श्री श्रीराम लाखे, श्रीवल्लभ जोशी व रत्नाकर कुलकर्णी या सर्वांचे अचूक व अमुल्य मार्गदर्शन मिळाले. गुरुंचा विश्वास, आईवडीलांचा आशिर्वाद, परिवार हितचिंतक आणि निसर्गाची साथ व आत्मविश्वास यामुळे त्यांना हे यश प्राप्त झाले. याबद्दल मी या सर्वांची रुणी आहे असे म्हणत त्यांनी सर्वांबद्दल आभार व्यक्त केले.