न्यूज पीसीएमसी नीटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) :- भारताचे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे उत्कृष्ट संसदपटू आणि प्रागतिक विचारसरणीचे थोर नेते होते, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस, वल्लभनगर येथील आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील त्यांच्या पुतळ्यास महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
मुख्य प्रशासकीय इमारतीत आज झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे , नगरसदस्या शारदा सोनवणे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कार्यक्रमास महापौर, उपमहापौर पदाधिकार्यांसमवेत माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्या सुजाता पालांडे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शंकर जाधव, उप वैद्यकीय अधिकारी डॉ.उज्वला आंदुरकर, प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले, आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे उपस्थित होते
















