- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती..
- पुतळ्याच्या संकल्पनेबद्दल दरेकरांनी नगरसेवकांचे केले कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रहाटणी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शनिवारी (दि. १३) झाले.
उद्घाटनप्रसंगी महापौर उषा ढोरे, उपमहापौर नानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, नगरसेविका सुनीताताई तापकीर, नगरसेवक सविताताई खुळे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक नाना काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रवीण दरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संकल्पनेबद्दल नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचे कौतुक केले.

विरोधी पक्षनेते दरेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी ऐतिहासिक कामगिरी आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडली आहे. महाराजांचा पुतळा नागरिकांना प्रेरणा देत राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांचा मी आभारी आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपासून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एक वीटही रचली नाही.
पुतळ्याची रचना…
पंचधातूमधील हा अश्वारुढ पुतळा आहे. पुतळ्याची जिरेटोपपर्यंतची उंची २१ फूट आहे. तलवारीच्या टोकापर्यंतची उंची २८ फूट इतकी आहे. या पुतळ्याचे वजन ६ टन असून फक्त घोड्याच्या मागील दोन पायावर उभा असणारा हा वैशिष्ट्यपूर्ण असा हा पुतळा आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस उंच दगडी बांधकाम असणारी कमानभिंत आहे. या कामासाठी २ कोटी २० लाख ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे. सुमारे १२ मीटर इतक्या उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे.
















