न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु.) :- जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कामात पदाधिकारी अधिकारी, ठेकेदार, सल्लागार, यांच्या संगनमतातून रिंग करुन, कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी संबंधीत याविषयाच्या निविदा रद्द करुन, फेर निविदा मागवाव्यात. तसेच रिंग करणारे सर्व ठेकेदार काळ्या यादीत टाकावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत रस्ते, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल आणि स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. या निविदा प्रक्रियेमध्ये सत्ताधारी, पदाधिकारी, अधिकारी, सल्लागार, संगणमत करुन निविदा प्रक्रिया राबवितात. विशिष्ट ठेकेदार डोळ्यांसमोर ठेऊन, त्यास पुरक अशा अटी शर्ती प्रशासनाच्य वतीने घालन्यात येतात. त्यामुळे संबंधित ठेकेदारच पात्र ठरतो. ठराविक ठेकेदारांशिवाय नवीन ठेकेदारांना निविदा भरु दिली जात नाही. भरल्यास राजकीय नेत्यांचे चेले दमबाजी करतात. दबाव टाकतात. यापुढे महापालिकेत कामे करु देणार नाही, अशी धमकी देतात. प्रसंगी मारहाणही करतात.
सत्ताधा-यांच्या संबंधित ठेकेदारांचीच चलती आहे. सत्ताधारी, प्रशासन आणि ठेकेदारांची रिंग असल्याने जनतेच्या पैशांची लूट होत आहे. गेल्या दोन महिन्यात स्थापत्यविषयक बारा कामे वाढीव दराने दिल्याने महापालिकेला सुमारे पंचवीस कोटींचा भूर्दंड सोसावा लागला आहे. नुकसान झाले आहे. व्ही.एम. मातेरे, अजवानी, धनेश्वर, बी. के. खोसे, क्लीन्सी, एस. एस. साठे, कृष्णाई इन्फ्रा, एस. आर. कन्स्ट्रक्श्न याच ठेकेदारांची चलती आहे. स्थापत्यविषयक कामांना हेच ठेकेदार निविदा भरतात. रिंग करुन त्यांच्यापैकी एकाला आळीपाळीने काम मिळत आहे. हे काम मिळणारे ठेकेदार पुढील प्रमाणे
कामाचे नाव निविदा दर ठेकेदाराचे नाव
राजीव गांधी पूल ते डांगे चौक बीआरटी मार्ग २ कोटी ३१ लाख, ७३ हजार ४२४ व्ही.एम. मातेरे श्री कन्स्ट्रक्शन, अजवानी आणि धनेश्वर
भोसरी ते वाकड बीआरटी मार्ग २ कोटी ४६ लाख, १० हजार १३४ धनेश्वर, श्रीगणेश, अजवानी
प्रभाग तीनमधील तीस मीटर रस्ता ३८ कोटी २४ लाख, ७० हजार ४९५ धनेश्वर, इंगवले पाटील अजवानी, कृष्णाई इन्फ्रा
च-होली ते साई मंदिर रस्ता १२ कोटी ९ लाख, ६३ हजार ६३४ श्रीगणेश, मोहनलाल मथाराणी, इंगवले पाटील
पुणे-आळंदी रस्ता ४२ कोटी ९५ लाख, ५६ हजार ९८२ कृष्णाई, धनेश्वर, मनीषा कन्स्ट्रक्शन,
पुणे-आळंदी रस्ता टप्पा दोन ४१ कोटी ८९ लाख, ९७ हजार३८२ धनेश्वर, कृष्णाई, आणि अजवानी
मोशी आळंदी कुदळवाडी रस्ता २५ कोटी १४ लाख, ४३ हजार २९४ इंगवले पाटील, मोहनलाल मथाराणी, व्ही.एम. मातेरे
च-होलीतील २५४ रस्ता १६ कोटी ४१ लाख, १९ हजार ६६ श्रीगणेश, क्लीन्सी, धनेश्वर,
चिखली दवाखाना १ कोटी ९८ लाख, ५८ हजार ८०५ नागनी पीएम, पवार पाटकर, हिरेन
च-होलीतील अठरा मीटर रस्ता २५ कोटी ४ लाख, ३४ हजार ४१४ मथाराणी, इंगवले पाटील, व्ही.एम. मातेरे
विशालनगर जगताप डेअरी रस्ता १३ कोटी २८ लाख, २३ हजार ३३२ एसएस साठे, क्लीन्सी, अजवानी, इन्फ्रा
आकुर्डी रेल्वे पीसीपी रस्ता ७ कोटी ३४ लाख, ४३ हजार ५२५ अजवानी, क्लीन्सी, एसएस साठे,
बीआरटीमार्ग वाकड १९ कोटी ५८ लाख, १५ हजार कृष्णाई, व्ही. एम. मातेरे बी. के. खोसे
प्रेरणा शाळा ते चिंतामणी रस्ता ६६ लाख, २० हजार १७७ बहिरट, बी. के. खोसे, टी. जी. धमानी
रावेत वाल्हेकरवाडी ३४ मीटर रस्ता १५ कोटी ६५ लाख, ५६ हजार ३०१ कृष्णाई, अजवानी, व्ही.एम. मातेरे
ब प्रभाग कार्यालय सुधारणा २१ कोटी ३६ लाख, १७ हजार १६३ बी. के. खोसे, एसएस साठे, नोबेल
आकुर्डी रेल्वे स्टेशन ते बास्केट पूल रस्ता ११ कोटी ८६ लाख, १३ हजार २६७ क्लीन्सी, एसएस साठे, अजवानी
त्याचबरोबर दि.१९/०१/२०१९ ची मा. महापालिका सभेत चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कामासाठी कंपनी स्थापन करुन, संचालक निवडीचा विषयही तहकूब सभा काल दि.०४/०२/२०१९ रोजी झाली. या सभेत प्रचंड गोंधळ होऊन कुठलीही चर्चा न होता. हा विषय मंजूर करण्यात आला. या विषयाची ही निविदाप्रक्रिया पूर्ण करुन, तब्बल ४५ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली होती. मात्र, जादा दराच्या निविदेमुळे तब्बल पाच कोटी रुपयांनी खर्च वाढत असल्याने या निविदाप्रक्रियेवर संशय निर्माण झाला होता.
या चिखलीतील संतपीठाच्या कामासाठी तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्या मे. एस. एस. साठे ठेकेदाराने १६ टक्के, मे. व्ही. एम. मातेरे १४ आणि मे. बी. के. खोसे या ठेकेदाराने ११.१६ टक्के जादा दराने निविदा भरल्या आहेत. त्यावरुन या तिन्ही ठेकेदारानी रिंग करुन, जादा दर भरला गेला आहे. या भूखंडावर संतपीठ बांधण्यात येणार असून, त्यासाठी महापालिका स्थापत्य विभागाने ४० कोटी ६१ लाख ३ हजार १२५ रुपयांची निविदा मागविण्यात आली होती. ही निविदा भरणा-या तिन्ही ठेकेदारांनी ती जादा दराने भरली आहे.
मे. बी. के. खोसे यांनी कमीत कमी ४४ कोटी ६१ लाख ७३ हजार ३२३ रुपयांमध्ये काम करण्याची तयारी दर्शविली. त्यात रॉयल्टी चार्जेस व मटेरियल टेस्टिंग चार्जेस मिळून ४५ कोटी ८ लाख ९७ हजार रुपये खर्च अदा करुन, संतपीठाचे काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, जादा दराच्या या निविदेमुळे तब्बल साडेचार कोटी रुपयांचा खर्च अधिक वाढला आहे. हा खर्च कोटीत असल्याने त्याबाबत संशय निर्माण झाला आहे.
काल दि.०४/०२/२०१९ रोजी झालेल्या मा. महापालिका सभेनंतर विरोधी पक्षनेते व संतपीठाच्या निविदा प्रक्रियेतील ठेकेदार यांचे ऑडीओ रेकॉर्डीग सीडी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून चिखली येथील असलेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कामात पदाधिकारी अधिकारी, ठेकेदार, सल्लागार, यांच्या संगनमतातून रिंग करुन कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे संबंधीत या विषयाच्या निविदा रद्द करुन फेर निविदा मागव्यात व वरील सर्व रिंग करणारे सर्व ठेकेदार काळ्या यादीत टाकावेत, असे भापकर यांनी या पत्रात म्हटले आहे.











