- अति व्यायाम अनं वजन उचलणे जीवावर बेतू शकतं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२२) :- पुनावळेतील फिटनेस क्लब जिममध्ये दररोज व्यायाम करणारा तरुण चक्कर येऊन बेशुद्ध पडला. जिममधील इतर सहकाऱ्यांनी तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच तरुणाला मृत घोषित करण्यात आले. अनमोल गोजे (वय २३ वर्षे) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या उन्हाळा असून जास्त व्यायाम आणि जास्त वजन उचलणे जीवावर बेतू शकतं, अस अनमोलच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी सांगितले आहे. मंगळवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली.












