न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रु.) :- आमदार महेश लांडगे व भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १३, यमुनानगर-निगड़ी परिसरात नुकतेच हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सौ. पुजाताई महेश लांडगे व सौ. पौर्णिमाताई दीपक मोढवे पाटील यांच्या संकल्पनेतुन शहरातील महिला भगिनींसाठी या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिला भगिनींना लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी व मोबाईल बक्षीस स्वरूपात देण्यात आला. यावेळी बाल-गोपाळांनी नृत्य स्पर्धेत सहभाग घेऊन धमाल उडवून दिली.
या कार्यक्रमास भाजपचे शहर उपाध्यक्ष दीपक मोढवे पाटील, नगरसेवक उत्तम केंदळे, सौ. पुजाताई महेश लांडगे, सौ. पौर्णिमाताई दीपक मोढवे पाटील, व आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शहरातील व प्रभाग क्रमांक १३ मधील महिला भगिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून, या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सर्व माता-भगिनींना आनंद देणारा, त्यांचा सन्मान करणारा हा नेत्रदीपक सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन दीपक मोढवे पाटील यांनी केले.











