न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड मनपाच्या स्थायी सभेत आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये मिळकतकरात कोणतीही वाढ न करता ते मिळकत कर जैसे ते ठेवले जाणार आहेत. आज झालेल्या स्थायीच्या सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड या होत्या.
आयुक्तांनी सादर केलेल्या मिळकतकराच्या अंदाजपत्रकावर चर्चा करत, त्यात कोणतीही वाढ न करता ते जसेच्या तसे महापालिकेच्या महासभेपुढे ठेवले जाणार आहे.
यावेळी कोणतीही करवाढ न झाल्याने नागरिकांना करवाढीचा ताण राहणार नाही. यावेळी या विषयाला काही उपसुचना यावेळी मांडण्यात आल्या त्यानुसार दिव्यांगाना करात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.











