न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२२) :- शिवसेना काळेवाडी, रहाटणी आयोजित भव्य शिवजन्मोत्सव २०२२ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते मित्र परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिववंदना घेण्यात आली. महाराजांच्या पुतळ्यास गुरुवर्य भागवताचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बाल शाहीर कु. परमवीर खंडू आव्हाड या बालकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा व अफजल खानाचा वध यांच्यावर पोवाडा गायला त्याप्रसंगी उपस्थित गायनाचार्य अरुण महाराज येवले, कोळी महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष डी एम कोळी, पवना हेल्थ क्लबचे संजय पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक दशरथ वीर, दत्तात्रय काटे, एकनाथ मंजाळ, नेताजी नखाते, सुनिल विटकर, राजेंद्र भरणे, जितेंद्र विटकर, सीताराम राणे, पद्माकर कद्रेकर, अशोक वाडेकर, जांभळे, गजानन वराट, शैलेश दळवी, हेडाव काका, रामकिसन वडणे, राम खामितकर, आबा वाघमारे, राम पाटील, धर्मा जाधव उपस्थित होते. ज्योतिबानगर आझाद चौक येथून महिला भगिनींची रॅली काढून रहाटणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यात सुजाता नखाते, तस्लीम शेख, मीना वैराट, रुपाली दळवी,गायत्री विटकर, कविता मंजाळ, मनिषा येडे, सौ. पाटीलताई, सौ. वाघमारेताई, कविता भोसले, कविता भोंडवे,सौ.मानेताई कोमल वायभट मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या..
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते, विभागप्रमुख गोरख पाटील, प्रदिप दळवी, शिवसेना संघटक गणेश वायभट, अंकुश कोळेकर, नरसिंग माने, दत्ता गिरी, सावता राम महापुरे, अनिल पालांडे, अमोल राठोड, महादेव बिक्कड, विकास काजवे, रवि घटकार, सुभाष लोंढे, अक्षय घटकार, अरुण हुमनाबाद, मनोहर तेली मोठ्या संख्येने शिवप्रेमी व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अंकुश कोळेकर यांनी केले.












