न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२२) :- संतांचा विचार अनु रेणू पेक्षाही सूक्ष्म असतो या विचाराने मध्ये आकाशाला कवेत घेण्याची ताकद आहे असे प्रतिपादन रामायणाचार्य ह भ प समाधान महाराज शर्मा यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज महोत्सवानिमित्त आयोजित संत तुकाराम नगर भोसरी येथील तुकाराम महाराज मंदिर येथे श्रीहरी कीर्तनामध्ये व्यक्त केले.
बीज महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नगरसेवक वसंत नाना लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुमारे दीड हजार महिलांनी पालखीची मिरवणूक काढून केली. एकसारख्या साड्या व फेटे बांधून महिलांनी फुगड्या फेर धरीत सहभागी झाल्या. प्रसिद्ध भजन गायिका मीराताई काटमोरे व महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता तुकोबाच्या चरणी फुलांचा वर्षाव भाविकांनी केला. वसंत नाना लोंढे प्रतिष्ठान भोसरीतील सफाई कर्मचारी महिलांसाठी साडीचोळी देऊन सत्कार केला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण लोंढे म्हणाले की, या आरोग्य दुतांचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कोरोनाच्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी करून सफाई केली. आपले आरोग्य राखावे यासाठी हे कर्मचारी सदैव सेवेत असतात त्यांच्या ऋणातून गौरव व्हावा म्हणून हा सत्कार आम्ही करत आहोत.
सामाजिक कार्यकर्त्या सुजाता लोंढे म्हणाल्या की, जेष्ठ नगरसेवक वसंत नाना लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिष्ठान नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांचा गुणगौरव, माजी सैनिकांचा सत्कार, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावरील कैवल्याचा पुतळा, भागवत कथा, तुका आकाशा एवढा असे सांप्रदायिक कार्यक्रम कायम राबवत आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा कीर्तन महोत्सव आयोजित केला होता कोरोना महामारी च्या काळामध्ये दोन वर्षांमध्ये आपण सर्वजण या आनंदापासून दूर होतो संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या कृपेने बीजे चा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा करताना आम्हाला आनंद झाला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिगंबर ढोकले सर यांनी तर, आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण लोंढे यांनी मानले.












