न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२२) :- शहीद दिवस दरवर्षी २३ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी त्या शहिदांचे स्मरण केले जाते. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना विशेष आदरांजली वाहिली जाते.
शहीद दिनानिमित्त हौतात्म्य पत्कारलेल्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली. स्वातंत्र्य सेनानी शहीद वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांच्या बलिदान दिनानिमित्त आज कुदळवाडी येथे नगरसेवक दिनेश यादव जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी बलिदान दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रकाश चौधरी, स्वराज पिंजन, स्वप्निल डावखरे, दीपक घन, श्याम थोरात, शरद गोरे, मोईद शेख कार्यकर्ते उपस्थित होते.












