न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रु.) :- नगरसेविका जयश्री गावडे यांनी महापालिका आणि निवडणूक आयोगाला चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आशिष गावडे यांनी केली आहे.
याबाबत गावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत जयश्री गावडे या चिंचवड प्रभाग क्रमांक १९ आनंदनगर, भाटनगरमधून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.
गावडे यांचे शालेय शिक्षण आठवी नापास आहे. त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात आठवी नापास असा उल्लेख आहे. मात्र, निवडणुकीतील उमेदवारी अर्जात त्यांनी शिक्षण दहावी उत्तीर्ण दाखवले आहे. नगरेसविका गावडे यांनी महापालिकेसह सरकारला चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे गावडे यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.











