न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच इतर पक्षीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्यात आला.
मनसे पिंपरी विधानसभा विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष श्रीकांत इंगळे व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे मा. स्वीकृत नगरसेवक हिरामण पवार यांचे चिंरजीव आकाश पवार यांनी अधिकृतरीत्या राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते फजल शेख, सामाजिक न्यायसेलचे अध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी काॅं. पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन आवटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विजय दळवी, रोझारीयो डिसूजा आदी यावेळी उपस्थित होते.











