न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रु.) :- क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी स्वतः लढाया करून, जगेन तर देशासाठी, मरेण तर देशासाठी, असा कानमंत्र देऊन, स्वातंत्र्याकरीता लढण्यासाठी सैनिकांना व समाजाला बळ निर्माण करून दिले आहे.
राज्य सरकारतर्फे पुणे येथे लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम चालू आहे. या निर्माण होणाऱ्या स्मारक समितीचे नामांतर ”क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारक समिती”, असे करावे, अशी मागणी शिवसेना व शिवशाही व्यापारी संघाचे नेते युवराज दाखले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन तसेच मातंग समाजाच्या अस्मितेचा विचार करून, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या अभिवादनार्थ ”क्रांतीवीर” या शब्दाचा उल्लेख स्मारक समितीच्या आद्यनावार्थ करावा.











