न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रु.) :- आग विझवण्यासाठी अग्निशमन केंद्रामध्ये सहजपणे पोहचता यावे, याकरीता चिखली-कुदळवाडी परिसरात जागोजागी स्थळ व दिशादर्शक फलक त्वरित लावण्यात यावेत, अशी मागणी स्वी नगरसेवक दिनेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीची दखल घेत, आयुक्त हर्डीकर यांनी चिखली अग्निशामक परिसरात दिशादर्शक फलक बसवण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची कार्यवाही झाली असून, परिसरात अग्निशामक विभाग दिशादर्शक फलक बसविण्यात आले असल्याचे, यादव यांनी सांगितले आहे.











