न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२२) :- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत आणि अंत्योदय अन्न योजनेतील अन्नसुरक्षा लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याच्या योजनेला मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली होती. त्यानंतर आता या योजनेला योजनेला पुन्हा मुदतवाढ मिळणार का, याविषयी शंका उपस्थित केली जात होती.
दरम्यान, या योजनेला आठवडाभरापूर्वी एप्रिल ते सप्टेंबर अशा पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली. मात्र, त्याबाबतचे आदेश राज्य सरकारकडून जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नव्हते. आता त्याबाबतचे आदेश मिळाल्याने धान्य वाटपाची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत मोफत धान्य ” वाटपास मुदतवाढ मिळालेली आहे. त्याबाबतचा शासन आदेश राज्य सरकारकडून प्राप्त झालेला आहे. त्यानुसार १० एप्रिलनंतर अन्नसुरक्षा व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप सुरू करण्यात येणार आहे.
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, निगडी…


















