- चार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२२) :- कामावरून सुटल्यानंतर घरी येत असलेल्या तरुणावर तलवारीने वार करून ऐवज लुटला, ही घटना आकुर्डी येथे घडली. सागर दामाजी वाघमारे (रा. एस.बी. शाळेमागे, रावेत) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार चार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे गुरुवारी (दि. ७) पहाटे तीनच्या सुमारास घरी येत असताना ते आकुर्डी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या लिंकरोडवर आले असता दोन दुचाकीवरून चौघेजण त्यांच्याजवळ आले.
त्याच्यावर कोयता व तलवारीने वार केले. सोनसाखळी, मोबाईल, रोकड, एटीएम, डेबिट क्रेडिट कार्ड असा एकूण ५२ हजारांचा ऐवज लुटला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.