- दुरुस्तीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे महावितरणाला निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२२) :- प्रभाग क्रमांक ३१ व ३२ मधील विद्युत डीपी बॉक्सची दयनीय अवस्था झालेली आहे. गेल्या १४ ते १५ वर्षापूर्वी बसवलेले हे डीपी बॉक्स आहेत. त्याची पावसाळ्यापूर्वी ताबडतोब दुरुस्ती करावी.
जेथे आवश्यक असेल तेथे नवीन डीपी बॉक्स बसवावेत, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणाच्या बिजलीनगर विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, शाखाप्रमुख नरसिंग माने, सावता महापुरे आदी उपस्थित होते.
















